मुंबई : मंत्रिपद देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नावाने 6 आमदारांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. राठोड असे या आरोपीचे नाव असून त्याला गुजरातच्या मोरबी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
राठोड याने आपण भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून महाराष्ट्रातील 4 आणि गोवा तसेच नागालँड येथील एक अश्या 6 मंत्र्यांना पैशांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. आरोपी हा मंत्रीपदासाठी इच्छूक असणाऱ्या आमदारांना मंत्री पदाची ऑफर करून जेपी नड्डा यांच्या नावाने त्यांच्याकडून पैसे उकळत होता अशी माहिती या आमदारांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील बदनापूर, मध्य नागपूर, कामट व इतर ठिकाणचे एक अश्या 4 आमदारांना आरोपीने गंडा घातला आहे. तर गोवा आणि नागालँड येथील प्रत्येकी एका आमदाराला फसविण्यात आले आहे.