Categories: सांगली

शिराळ्यात नागपंचमी निमित्त जय्यत तयारी, पोलीस प्रशासन सज्ज

सुधीर गोखले

सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्याची नागपंचमी, संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी शिराळा गावी येतात. येत्या सोमवारी म्हणजेच दि २१ ऑगस्ट रोजी हा सण साजरा होत आहे त्यानिमित्ताने प्रशासन सज्ज आहे.

शिराळा पोलिसांनी तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. विशेषतः येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष प्रयत्न आहेत. वाहनांच्या गर्दीने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरातील वाहतुकीत मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असून हे बदल त्या दिवशी संपूर्ण दिवसभर लागू असणार आहेत. पुणे बेंगळुरू महामार्गावरील पेठ नाक्यापासून ते शिराळा गावापर्यंतच्या मार्गालाही पर्याय दिले असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ बसवराज तेली यांनी सांगितले.

बदल पुढील प्रमाणे असतील – महामार्ग क्रमांक ४ वरील पेठनाका ते शिराळा गावाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे तर शिराळ्याकडून महामार्गाकडे येणारी वाहने शिराळा बायपास मार्गे कापरी, कार्वे ढगेवाडी फाटा, ऐतवडे बुद्रुक फाटा, लाडेगाव वशी येडेनिपाणी फाटा या मार्गे येतील. शिराळा बायपास पासून पेठनाकापर्यंत संपूर्ण वाहतुकीला दि २१ रोजी बंदी असेल. शिराळा हे गाव नागपंचमी साठी जगप्रसिद्ध आहे. विविध आंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी या गावावर माहितीपटांची निर्मितीही केली आहे.

अलीकडील काळात न्यायालयीन आदेशामुळे जिवंत नागांच्या मिरवणुकीवर बंदी असली तरी लाखो भाविक या गावी नागांच्या प्रतिमांचे पूजन करण्यासाठी येतात. नाग आणि साप हे बळीराजाचे मित्रच आहेत या गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर नाग पकडले जात असत आणि त्यांची मिरवणूक काढली जात असे नंतर नागपंचमी सन संपल्यावर त्यांना त्यांच्या अधिवासात मुक्त केले जायचे पण अलीकडील काळात हि प्रथा बंद झाली. न्यायालयाचे आदेश असल्याने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात नागपंचपमी साजरी होऊ लागली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago