Sangli | आषाढी एकादशी निमित्त सांगली एस.टी. आगार सज्ज, आषाढी निमित्त तब्बल 280 बसेस सोडण्याचे नियोजन

सुधीर गोखले

सांगली : राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगारा मार्फत यंदा च्या आषाढी एकादशी निमित्त सांगलीमधून तब्बल २५० बसेस सोडण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगलीतले तर या आषाढी एकादशीनिमित्त वारीच्या कालावधी मध्ये चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

नियोजित आषाढी एकादशी निमित्त सांगली मधून ३८ फेऱ्यांचे तर मिरज ३२ इस्लामपूर २९ तासगाव २९ विटा २८ जत २८ आटपाडी २९ क महांकाळ २५ शिराळा २२ पलूस आगारातून १८ बसफेऱ्यांचे नियोजन आहे. राज्य शासनाने या आधीच महिला प्रवाशांना अर्ध्या तिकीटाची सवलत दिली आहे ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास उपलब्ध आहे तर ६० वर्षावरील प्रवाशांना अर्धे तिकीट आकारले जाते.

अशा भरीव सवलती मुळे सध्या सर्वसामान्य प्रवाश्यांचा ओढा एस टी ने प्रवास करण्याकडे अधिक आहे तसेच प्रवासही सुरक्षित होत असल्याने यंदा आम्हाला अधिक उत्पन्नाची अपेक्षा यंदाच्या आषाढी एकादशी मधून असल्याचे त्यांनी सांगितले