भाजप ओबीसी मोर्चा च्या वतीने देऊळगाव गाडा येथे स्वच्छता अभियान संपन्न

दौंड : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा च्या वतीने, दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे स्वछ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा कार्यक्रम पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे नवनियुक्त सरचिटणीस डी.डी. बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

‘स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज १ ऑक्टोबर रोजी राज्यात ‘एक तारीख, एक तास’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरी तसेच ग्रामीण भागातील जनतेने या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी केले आहे.

शासनाच्या स्वछ भारत अभियान अंतर्गत आज एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम देऊळगाव गाडा येथे राबविण्यात आला. यावेळी देऊळगाव गाडा परिसराची स्वछता करण्यात आली. या प्रसंगी माजी सरपंच मारुती कोकरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब बारवकर, पोपट बारवकर, आप्पासो बारवकर, भुजंग बारवकर, मच्छिन्द्र बारवकर, धनंजय शितोळे, केशव बारवकर, किशोर जगताप व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

दौंड तालुक्यातीचे आमदार राहुल कुल, भाजप जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष गजानन वाकसे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे यावेळी डी.डी. बारवकर यांनी सांगितले.