मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने ‛स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांना अभिवादन

दौंड : हिंदुस्थान च्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने नियोजित सावरकर स्मारक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी डॉ. हेडगेवार समिती चे अध्यक्ष दत्ताजी शेणोलीकर यांनी सावरकरांच्या विचारांचा वारसा आम्ही नवीन पिढीला समृद्ध करण्यात कमी पडलो अशी खंत व्यक्त केली ,तर श्याम वाघमारे यांनी सावरकरांचा जे लोक अपमान करतात त्यांनी अंदमान च्या काल कोठडीत एक रात्र तरी राहून दाखवावे असे आव्हान केले. रवींद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात दौंड नगरपालिका कसा दुजा भाव करत असल्याचे उदाहरणांसह सांगितले. ज्या राष्ट्रपुरुषाची जयंती आहे त्या दिवशी त्यांच्या स्मारकास नगरपालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई व सजावट केली जाते अशी शहरात प्रथा आहे.

पण आज महाराष्ट्र शासनाने २८ मे हा गौरव दिवस म्हणून साजरा करवा असे आवाहन करून देखील नगर पालिका प्रशासनाने याची साधी दखल देखील घेतली नाही, ना कोणी प्रशासन अधिकारी जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते .त्यामुळे दौंड नगरपालिका प्रशासनाचा रवींद्र जाधव यांनी जाहीर निषेध केला. मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी स्मारकास निधीची कमतरता पडू देणार नाही आणि त्वरित हे काम पूर्ण करणार याचे वचन दिले.

या अभिवादन कार्यक्रमात रघुवीर अंतरकर, अर्चना साने, दिलीप लोहकरे, मा. नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, योगेश कटारिया तसेच ग्रामपुरोहित, शिवाजी मल्लाव, प्रसाद गायकवाड, ऍड बोडखे, श्रीकांत काटे, गणेश शिंदे, रामेश्वर मंत्री तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला व युवा वर्ग उपस्थित होता.
मृत्युंजय प्रतिष्ठान चे कार्यकारी सदस्य मनोहर भोर, किरण फराटे,कार्याध्यक्ष सतीश सोनोने, उपाध्यक्ष प्रकाश भालेराव उपस्थित होते. अध्यक्ष विवेक गटणे यांनी सर्वांचे आभार मानले. सुधीर गटणे यांनी वंदे मातरम सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.