सावधान.. कोरोनाचा नवा अवतार ‛ओमायक्रॉन’मुळे तिसरी लाट येण्याची शक्यता! केंद्राने दिले राज्यांना महत्वाचे निर्देश

– ओमायक्रॉनमुळे पुन्हा निर्बंधांची भीती
– केंद्राच्या राज्यांना तातडीच्या सूचना
– नाईट कर्फ्युसह इतरही निर्बंधांच्या सूचना
– ओमायक्रॉनमुळे रोज 14 लाख नवे रूग्ण आढळण्याची भीती


मुंबई : मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक संसार उध्वस्त केले. अनेक लहान, तरुण आणि वयस्क लोक या दुसऱ्या लाटेचे शिकार झाले. काही दिवसांपूर्वी ठणठणीत असलेल्या अनेक लोकांनी अचानक कोरोनाचे शिकार होत या जगाचा निरोप घेतल्याचे सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून केंद्राने राज्यांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाचा नवा अवतार असलेल्या ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यात स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी आवश्यकतेनुसार
तातडीची पावलं उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाईट कर्फ्युसह इतरही निर्बंधांच्या सूचना केंद्राने केल्या आहेत. डेल्टाची जागा ओमायक्रॉनने घेतल्यास रोज १४ लाख नवे रूग्ण आढळण्याची भीती कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे.

  • केंद्राचे राज्यांना निर्देश…
  • स्थानिक पातळीवर तातडीने संसर्गाला आळा घालावा.
  • राज्यांनी अधिक दक्षता बाळगावी.
  • गरज पडल्यास आणखीन निर्बंध लागू करावे.
  • स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्युचा अवलंब.
  • मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालावे.
  • लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीवर मर्यादा घालाव्या.
  • कंपन्या, ऑफिसमधील उपस्थितीवर मर्यादा घालाव्या.
  • सार्वजनिक वाहतूक सेवेतील गर्दी आवरावी.
  • ‛ओमायक्रॉन’ डेटा विश्लेषण करावे, वेगवान निर्णय घ्यावे. अश्या पद्धतीच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत.