कार्यालये ‘केडगाव’ची जागा मात्र ‘बोरीपार्धी’ची! गाव पुढारी आतातरी जागे होणार का? नागरिकांचा संतप्त सवाल

दौंड : दौंड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून केडगावचा नावलौकिक आहे. केडगाव हे अती प्राचीन गाव असून त्याच्या नव्या आणि जुन्या बाजारपेठेला मोठा इतिहास आहे. मात्र इतके सगळे असूनही सध्या केडगावची वाटचाल ही अधोगतिकडे चालली आहे कि काय अशी शंका येथील सर्वसामान्य नागरीक व्यक्त करताना दिसत आहेत.

याचे कारणही तितकेच विचार करायला लावणारे असून केडगावला मोठी बाजारपेठ, ग्रामपंचायतच्या मालकीची मोक्याच्या ठिकाणी मुबलक जागा असूनही केडगावच्या नावाने आलेली विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये ही आजही बोरिपार्धी हद्दीमध्ये वसलेली दिसत आहेत. नाव केडगावचे आणि जागा मात्र बोरिपार्धीची? हा नेमका काय प्रकार आहे आणि ही कार्यालये आतातरी केडगाव हद्दीमध्ये येणार का? असा सवाल येथील नागरिकांना पडला आहे.

केडगाव ही जिल्ह्यात मोठे नावलौकिक असणारी बाजारपेठ आणि तितकेच प्रसिद्ध असलेले गाव. या गावची लोकसंख्या 30 हजारांच्या घरात पोहोचत आहे. 6 मोठे ग्रामपंचायत वार्ड आणि केडगाव स्टेशनला आलेले शहराचे स्वरूप पाहता आता केडगावची वाटचाल ही नगरपरिषद म्हणून सुरु झालेली दिसत आहे. मात्र या गावच्या पुढाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले कि काय अशी शंका येथील नागरीक उपस्थित करीत असून एक-दुसऱ्याच्या ‘जिरवा जिरवीत’ केडगावचाच विकास खुंटून केडगावचीच ‘जिरत’ असल्याचे नागरीक बोलत आहेत.
केडगावच्या नगपरिषदेसाठी ना कोणता ठराव होताना दिसतोय! ना कोणी पुढाकार घेऊन या गावाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी झगडताना दिसतोय. ‘मेरा सपना, माल कामावो अपना अपना’ इतकेच काय ते प्रत्येकजण विचार करत असून यात केडगावच्या विकासाचा श्वास मात्र गुदमरताना दिसत आहे.

केडगावची अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस केडगाव सारख्या प्राचीन गावाला दुसऱ्याच्या ओंझळीने पाणी पिल्याशिवाय गत्यंतर उरणार नाही त्यामुळे आत्ताच काय ती योग्य पावले उचलून केडगावच्या हक्काची शासकीय, निमशासकीय कार्यालये ही केडगाव हद्दीत आणली तरच केडगावला पुन्हा रहदारी वाढून वैभव प्राप्त होणार आणि त्यातून बेरोजगार युवकांच्या व्यवसायांचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago