महिला आणि बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवरच करत होता बलात्कार, पत्नीही साथ देत असल्याने दोघांना अटक

Crime news : मृत मित्राच्या अल्पवयीन मुलीवर महिला आणि बाल विकास विभागातील एका वरिष्ठ अधिकारी वारंवार बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकरणात त्याला त्याची पत्नीही मदत करत असल्याने या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमोदय खाखा असे नराधम अधिकाऱ्याचे नाव आहे.


मिळत असलेल्या माहितीनुसार साल 2020 साली पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन असताना या अधिकाऱ्याने तिच्यावर अत्याचार सुरू केले. या मुलीचं सध्याचं वय 17 असून या मुलीवर सदर नराधम अनेक महिने बलात्कार करत राहिला त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि या मुलीची प्रकृती बिघडली. यातूनच या प्रकरणाला अखेर वाचा फुटली.


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या पीडित मुलीच्या वडिलांचे 1 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले त्यानंतर पीडित मुलगी आरोपी प्रेमोदय खाखा आणि त्याच्या कुटुंबासह राहत होती. प्रेमोदय खाखा हा महिला आणि बाल विकास विभागात उपसंचालक असून पीडित मुलगी त्याला मामा म्हणून हाक मारत होती.

मुलगी 14 वर्षांची असताना आरोपीने नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपी प्रेमोदय आणि त्याच्या पत्नीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीवर मुलीची गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या दिल्याचा आरोप आहे.
डीसीपी (नॉर्थ) सागर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.