Categories: क्राईम

Breaking News – भाजपाच्या मा.राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा विरोधात दौंडमध्ये अखेर गुन्हा दाखल, पैगंबर साहेबांविषयी नुपुर शर्मा ने केले होते आक्षेपार्ह विधान

पुणे/दौंड

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (prophet mohammad) यांच्याविषयी टीव्ही चॅनल वरील चर्चासत्रातील एका कार्यक्रमात भाजपाच्या मा.राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा (nupur sharma) यांनी अतिशय वादग्रस्त व आक्षेपार्ह विधान केल्याने संपूर्ण जगभरात संतापाची लाट आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समस्त मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे नुपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दौंड शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने दौंड पोलिसांना करण्यात आली होती. त्यानुसार मा.नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी नुपुर शर्मा विरोधात गुन्हा दाखल केला आहे (Fir against nupur sharma)

नुपुर शर्मा यांच्या या समाजविघातक कृत्याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने दि.10 जून, शुक्रवार रोजी दौंड येथे निषेध मोर्चाचे व नुपुर शर्मा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणार असल्याचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले होते. त्यामुळे दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी येथील मुस्लिम समाजातील प्रमुखांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी दौंड पोलिसांनी नुपुर शर्मा यांनी केलेल्या समाजविघातक कृत्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच दौंड पोलिसांनी जर नुपुर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला तर आम्ही आमचे आंदोलन करणार नाही असे मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी स्पष्ट करण्यात आले.पो. निरीक्षक विनोद घुगे आणि दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथील मुस्लिम समाजाच्या भावना व मागणी कळविली. पोलीस प्रशासनातील चर्चेनंतर, मुस्लिम समाजाची मागणी मान्य करण्यात आली. नुपुर शर्मा विरोधात भा.द.वि. 295(अ),153(अ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. समाजाची मागणी पोलीस प्रशासनाने मान्य केल्याने व नुपुर शर्मा विरोधात गुन्हा दाखल केल्याने मुस्लिम समाजाने आपले आंदोलन मागे घेतले.

नुपुर शर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला दौंड मधील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता. या सर्वांचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी बादशहा शेख, सोहेल खान, मतीन शेख,शहानवाज पठाण, इस्माईल शेख ,शफी मुलानी, हमीद शेख, इमरान शेख, प्रकाश भालेराव,सतीश थोरात, विकास कदम, इंद्रजीत जगदाळे,गुरुमुख नारंग, आनंद पळसे ,नागसेन धेंडे, अश्विन वाघमारे ,आबा वाघमारे, अनिल साळवे,राजेश जाधव,निखिल स्वामी, अजय राऊत, संजय बारवकर तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago