Categories: Previos News

शिरूरमध्ये गोळीबार प्रकरणातील NK साम्राज्य ग्रुपचा कुख्यात मोक्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा LCB कडून जेरबंद



| सहकारनामा |

पुणे : शिरूरमध्ये भरदिवसा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग LCB ला यश आले असून यातील NK ग्रुप चा मोक्यातील कुख्यात आरोपी गणेश चंद्रकांत कुर्लप याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील वॉन्टेड फरारी असलेल्या आरोपी यांचा शोध घेऊन  कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  त्यानुसार सदर पथक हे तालुक्यात रामलिंग रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांना बातमी दारामार्फत दिनांक 26/01/2021 रोजी सी.टी बोरा कॉलेज रोडवर मोटरसायकलवर येऊन प्रवीण गोकुळ गव्हाणे या युवकावर गोळीबार करून पसार झालेला मोक्यातील आरोपी गणेश चंद्रकांत कुर्लप (रा.शिरूर जि.पुणे) हा रामलिंग रोड येथे येणार असल्याचे समजले.

 हि माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गणेश चंद्रकांत कुर्लप याला रामलिंग रोड येथे जाऊन सापळा रचून अटक केली. सदर आरोपी हा कुख्यात असून यापूर्वी त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे खालीलप्रमाणे

1) C.R No. 33/2013,  IPC 307,341,141,143,147,148,504, 506.

 2) C.R No. 514/2016 IPC 302, 143, 147, 148, 149, 109, 120(B) 

 3) C.R No. 59/2021 IPC 307,143,147,148,149,341,120(B),109, Arm Act 3,4,25,27 सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii),3(4) गुन्हे दाखल आहेत. 

सादर आरोपी हा जानेवारी महिन्यातील जीवघेण्या गोळीबार प्रकरणापासून फरार होता. सदर आरोपी पुढील कार्यवाही साठी त्यास शिरूर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 सदरची कारवाई मा.श्री अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, श्री.मिलिंद मोहिते अप्पर पोलिस अधीक्षक, श्री.अमृतराव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, पोसई रामेश्वर धोडगे, पोसई हनुमंत पडळकर, सहा.फौ दत्तात्रय गिरिमकर, पोहवा जनार्दन शेळके, पोना.राजू मोमीन, पो.ना अजित भुजबळ, पो.ना मंगेश थिगळे, पो.कॉ प्रसन्नजीत घाडगे, पो.ना दिनेश कुंभार, पो.कॉ प्रवीण पिठले, पो.कॉ विशाल कोथळकर, मपोका गव्हळी, पो.कॉ अरुण पवार यांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago