शौकत शेख
सोमेश्वर : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली भोर, पुरंदर, वेल्हा, मुळशी या चार तालुक्यातील सर्व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी यांचा पदनियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी परिसरातील निसर्ग, गडकोट, प्राचिनमंदिरे, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे तालुके अशा ठिकाणी पर्यटन व यातून रोजगाराच्या संधी कश्या निर्माण होतील याविषयी सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमात निरा येथील काही पदाधिकारी यांना बढती देण्यात आली. ज्यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जिल्हा समन्वयक म्हणून सुभाष जेधे, पुरंदर तालुका उपाध्यक्षपदी मिलिंद केंडे, तालुका कार्याध्यक्षपदी प्रमोद डांगे, तालुका महिला कार्याध्यक्षपदी संध्या जगताप, निरा शहर अध्यक्षपदी विजय शिंदे तर निरा शहर उपाध्यक्षपदी सुरेश सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप, जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार, जिल्हा महिला अध्यक्षा प्रियंका काटे व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.