News Effect : देशमुखमळा-वाखारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू, ‛सहकारनामा’च्या बातमीचा जबरदस्त इफेक्ट



दौंड : सहकारनामा ऑनलाइन 

दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या देशमुखमळा-वाखारी रस्ता आणि साईड पट्ट्यांची अवस्था काही महिन्यातच बिकट बनू लागली आहे. या बाबतचे सविस्तर वृत्त आज ‛सहकारनामा’ ने लावताच संबंधित विभागाला जाग येऊन रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

ऐन पावसाळ्यात तेही पडत्या पावसात या लाखो रुपयांच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने या रस्त्याची अवस्था बिकट बनत चालल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.

याबाबतचे सविस्तर वृत्त सहकारनामा ने लावताच संबंधित विभाग/ठेकेदार यांनी युद्ध पातळीवर या रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 

सहकारनामा ने लावलेल्या बातमीचा इफेक्ट होऊन हे सुरू झाल्याने येथील नागरिकांनी फोनवरून सहकारनामा चे आभार मानले आहेत.