News Anchor Rohit Sardana Death – आजतक चे अँकर ‛रोहित सरदाना’ यांचे निधन



| सहकारनामा |

नवी दिल्ली : आजतक या हिंदी न्यूज चॅनेल चे अँकर रोहित सरदाना यांचं आज कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झालं. रोहित सरदाना यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 

कोरोनावर उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका धक्का आला आणि यात त्यांचं निधन झालं.याबाबतची माहिती जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी दिली तसेच याबाबत झी न्यूज चा अँकर सुधीर चौधरी यानेही ट्विट करुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रोहित सरदाना हे अगोदर झी न्यूजमध्ये काम करत होते नंतर त्यांनी झी न्यूज सोडून आजतक न्यूज चॅनेल जॉईन करत त्यामध्ये स्टार अँकर म्हणून काम सुरू ठेवले होते.