दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांचे निकाल आश्चर्यकारक रीत्या लागत असल्याचे दिसत आहे. जसजसे निकाल हाती येऊ लागले आहेत तसतशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ माजू लागली आहे. अगोदर भाजप 10 तर राष्ट्रवादी 08 अशी परिस्थिती झाली होती नंतर पुन्हा एकदा भाजप 09, राष्ट्रवादी 09 अशी परिस्थिती बनली. आता सध्या सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज करण्याचे काम सुरु असून यामुळे वरील निकालात काही बदल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप 09 : ग्रामपंचायत – 04, सोसायटी – 4, 1 हमाल मापाडी. राष्ट्रवादी 09 : सोसायटी – 07, व्यापारी – 02
सुरुवातीला कुल (भाजप) गटाने ग्रामपंचायत विभागात 4-0 अशी आघाडी घेत थोरात (राष्ट्रवादीचा) गटाला घाम फोडला होता. नंतर कुल गटाने अनपेक्षितपणे सोसायटी गटातही जोरदार मुसंडी मारत एकूण 10 जागेवर वर्चस्व प्रस्थापित केले होते मात्र री काऊंटिंगमध्ये हि संख्या 09 वर आली. त्यामुळे भाजप 09 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 09 अशी सद्य परिस्थिती आहे. आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कुल (भाजप) गट अनपेक्षितरीत्या सोसायटी गटातहि आघाडी घेत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात मात्र निराशेचे वातावरण आहे.
सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जाण्याची नामुश्कि ओढवली आहे. सध्या हाती येत असलेल्या निकालावरून 09 ठिकाणी कुल गट तर 09 ठिकाणी थोरात गटाची सरशी दिसून येत असून हिच परिस्थिती राहिली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती कोण होईल यावर तर्क वितर्क लावले जात आहेत.
सकाळी सुरु झालेली मतमोजणी सध्या आटोपली असून अजूनही बेरीज करण्याचे काम सुरु आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसले असून गेल्या 20-25 वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत थोरात (राष्ट्रवादी) यांची एक हाती सत्ता असताना त्या सत्तेला छेद देण्याचे काम कुल (भाजप) गटाकडून होताना दिसत आहे. दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सध्या मोठ्या चूरशीची लढत पहायला मिळत असून कधी कुल 09 – थोरात 09 तर कधी एक दोन जागेवरून निकाल मागे पुढे होताना दिसत आहेत.
विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते यांचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…