| सहकारनामा |
मुंबई :
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णांना ऑक्सिजनची अत्यंत गरज भासत आहे. त्यामुळे आता केंद्रसरकारने ऑक्सिजन द्यावा यासाठी आम्ही पायाही पडायला तयार आहे अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राला केली आहे.
सध्या केंद्रात भाजप चे तर राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राज्याला योग्य प्रमाववर सुविधा उपलब्ध होत नसल्याचा आरोप महा आघाडीतील अनेक नेते करत होते मात्र आता खुद्द आरोग्यमंत्र्यांनीच पाया पडतो पण ऑक्सिजन द्या अशी विनंती केल्याने पुन्हा एकदा केंद्र राज्याला दुजाभावाची वागणूक देते की काय अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
नुकतेच उच्च न्यायालयानेही काहीही करा पण ऑक्सिजन उपलब्ध करून द्या, मग त्यासाठी भीक मागा नाहीतर काहीही करा अशा शब्दांत केंद्र सरकारचे कान टोचले आहेत. त्यामुळे आता केंद्रसरकार राज्य सरकारला कशा पद्धतीने मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.