Categories: राजकीय

दौंडमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार.. राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख यांचा राष्ट्रवादीला राम-राम! खा.सुळे, मा.आ.रमेश थोरात यांच्याकडून अपमानित केले गेल्याने पक्षाला सोडचिठ्ठी – बादशाह शेख

अख्तर काझी


दौंड : गेली पस्तीस वर्ष ज्या पक्षासाठी मी रस्त्यावर उतरून काम केले, पक्षासाठी जेल यात्रा भोगली, असे असतानाही मी प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करीत राहिलो. अशा कार्यकर्त्याचा जर पक्षात अपमान होत असेल तर वेळ पडली तर घरी बसणार परंतु अपमानित होऊन राजकारण करणार नाही.

मध्यंतरी शहरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मी शहरातील पक्षाच्या परिस्थितीबाबत सत्य सांगण्याचे धाडस केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांना माझ्या या भूमिकेचा राग आला, मा. आमदार रमेश थोरात यांनी मला पुढे बोलू दिले नाही, त्यामुळे मी हा माझा अपमान आहे असे समजून दौंड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे असे खळबळजनक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशाह शेख यांनी केले आहे.

बादशाह शेख यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मा. आमदार रमेश थोरात यांच्यासारखा खोटा माणूस मी माझ्या 30-35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पाहिलेला नाही, माझ्या समर्थकांची व माझ्या सहकारी नगरसेवकांशी चर्चा करून पुढे नेमके काय करायचे हे ठरविणार असल्याचेही बादशाह शेख यांनी सांगितले. दिवाळीआधीच बादशाह शेख यांनी फोडलेल्या बॉम्बमुळे येथील राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

अधिक वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत…

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

5 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

18 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

20 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

22 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago