|सहकारनामा|
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेल च्या पुणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्षपदी अफसर खान (उत्तर भारतीय छप्परबंद समाजाचे नेते) यांची निवड करण्यात आली आहे.
अफसर खान यांना दिनांक 05 जुलै 2021 रोजी माजी आमदार, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
अफसर खान यांचा समाज हा पुणे जिल्हा आणि विविध तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी असून त्यांचे लोकांप्रति असलेली सहकाराची भावना आणि संघटन कौशल्य पाहून त्यांची या पदावर निवड करण्यात आल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
अफसर खान यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दौरे करणार असून यामाध्यमातून या उपेक्षित लोकांना हिरालाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली एकत्र करून त्यांना पक्षाशी जोडणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा अणि तालुका बूथ कमिटीवर कार्यकर्त्यांची फळी तयार करून सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करू आणि देशाचे नेते शरद पवार साहेब, अजित दादा पवार, सुप्रियाताई सुळे आणि जयंत पाटील साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी मी काम करेल असे शेवटी सांगितले.
अफसर खान यांच्या निवडीने पुणे जिल्हा आणि दौंड तालुक्यातील विविध मान्यवर आणि समाजकीत कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.