चोरांनी कितीही लाल पोटले सोशल मिडियावर टाकले तरी आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, ही तर फक्त सुरुवात आहे : नवाब मलिक

मुंबई : माझ्याकडे जे काही आहे ते कागदावर आहे आणि ते सर्वांसमोर आहे. मात्र हे चोर लोक लाल पोटल्या सोशल मीडियावर टाकून माझ्याकडे बोट दाखवत आहेत. मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी यांच्या बापालाही घाबरणारा नसून यांच्याकडे कुठे कुठे काय काय आहे. किती बेनामी संपत्ती आहे, कुठे हॉटेल आहेत आणि त्यात काय धंदे चाललात हे सर्व या प्रकरणात बाहेर निघणार आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी मीडियाला दिली आहे.
मी भंगारवाला आहे, पण यांच्यासारख्या चोर नाही. माझे जे काही आहे ते कागदावर आहे. यांच्यासारखे डाकूकडून सोने घेतलेले नाही. बँका बुडवून कुणी कुणी कुठे कुठे काय काय केलेलं आहे, वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे, कोणत्या हॉटेलचा मालक कोण आहे, त्या हॉटेलमधून क्रूझवर काय गेलं आणि कसं गेलं… हॉटेलच्या केटरिंग मध्ये ड्रग्ज कसं गेलं हे आता समोर येतंय. तुम्हीं इतके का घाबरताय, आता कुठे सुरुवात झाली आहे असा इशारा मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.
माझ्या, माझ्या मुलांच्या, मुलींच्या किंवा अन्य कुणाच्या नावावर कुठे, काय आहे हे किती शोधायचे आहे ते शोधा आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर अजिबात घाबरत नाही असे शेवटी त्यांनी म्हटले आहे.