Categories: मुंबई

किरीट सोमय्यांचे फटाकेफुसके, खरी पोलखोल आम्ही करणार : नवाब मलिक

किरीट सोमय्यांचे फटाके, खरी पोलखोल आम्ही करणार : नवाब मलिक

मुंबई : किरीट सोमय्यांनी दिवाळी नंतर खरे फटाके फोडणार आणि ठाकरे सरकारमधील 3 मंत्री आणि त्यांच्या जावयांचे घोटाळे बाहेर काढणार असा इशारा आज सकाळी दिला होता. या इशाऱ्याला आता मंत्री नवाब मलिक यांनीही जशास तसे उत्तर दिले असून त्यांची धमकी पोकळ असून आम्ही असल्या धमक्यांना घाबरत नाही, यांची खरी पोलखोल तर अधिवेशनात आम्हीच करणार आहोत असा पलटवार मलिक यांनी केला आहे.

क्रांती रेडकर यांनी सोमय्या यांची भेट घेतल्यानंतर सोमय्यांनी मलिकांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही लढाई आता लग्नाचे आणि बर्थ सर्टिफिकेट, खरे की खोटे, एनसीबीची संशयित कारवाई या मुद्द्यांना बाजूला सारून आघाडी सरकार विरुद्ध भाजप अशी झाल्याचे दिसत आहे.

‛रामदास आठवले’ यांना मलिक यांचा सल्ला..
रामदास आठवले यांची वानखेडे कुटुंबाने भेट घेतल्यानंतर आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडे यांना क्लिनचिट देऊन टाकत नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती. याला उत्तर देताना नवाब मलिक यांनी दलित व्यक्तीचा अधिकार एक व्यक्ती हिरावत असेल आणि तुम्ही त्याला पाठिंबा देत असाल तर हे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago