ही ‛चार’ जणांची चांडाळ चौकडी सर्व खेळ खेळत आहे, तोपर्यंत पिक्चर सुरू राहील : नवाब मलिक यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची पत्रकार परिषद आज रविवार दि.7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली आणि त्यांनी या पत्रकार परिषदेत मोठं मोठे खुलासे करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.
समीर वानखेडे, व्हीव्ही सिंग, आशिष रंजन आणि त्यांचा एक ड्रायव्हर माने ही चांडाळ चौकडी हा सर्व खेळ खेळत असल्याचा मोठा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे आणि यांतील व्हिलन जोपर्यंत जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत हा पिक्चर चालू राहील असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोठ्या स्क्रीनवर काही व्हिडीओ आणि फोटोही दाखवले आहेत.
आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक ‛हॉटेल ललित’ बाबत कोणता गौप्यस्फोट करणार याची उत्सुकता अगोदरच शिगेला पोहोचली होती. त्यामुळे सर्वांच्याच नजरा त्यांच्या बोलण्याकडे लागल्या होत्या. नवाब मलिक यांनी आज रविवारी सकाळी-सकाळीच आर्यन खान (aryan khan) केस प्रकरणातील सॅम उर्फ सॅनविल (sanville d’souza) डिसोझा आणि वरिष्ठ एनसीबी अधिकारी व्हीव्ही सिंग (v v singh) यांच्यामधील संभाषण प्रसिद्ध केल्याने ही उत्सुकता शिगेला पोहचली होती.
नवाब मलिक यांनी अखेर या सस्पेंस्वरून पडदा हटवला असून त्यांनी मुंबई येथील नूर मंजिल निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हॉटेल ललित संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
हॉटेल ललित मध्ये सात महिन्यांपासून काही रूम बुक असून या रुममधून वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी सर्व खेळ खेळत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या प्रायव्हेट आर्मीकडून हाय प्रोफाइल लोकांना ट्रॅप करून कशापद्धतीने गुंतवले जायचे आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन कसे सोडले जात होते याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.
शिवाय वानखेडे यांनी ज्या क्रूझमध्ये जाऊन कारवाई केली, त्यानंतर जी केस बनविण्यात आली त्यामध्ये जे एक प्रॉडक्ट पकडले गेले त्या प्रोडक्टमध्ये ड्रग्ज घेतले जात असायचे असा आरोप करून त्या प्रोडक्टचा जो काशीफ खान मालक होते त्या मालकाला का पकडले नाही? तो विविध मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करतोय हे लवकरच सिद्ध होईल असे त्यांनी सांगितले.

मोहित कँबोज यांच्या आरोपांवर मलिक यांनी बोलताना मोहित कंबोज उर्फ भारतीय याचा मेहुना त्या क्रूझ ड्रग्ज पार्टीत सापडला होता. त्याने त्याच्या मेहुण्याला समीर वानखेडे यांना सांगितल्याने त्यातून सोडले होते. यात एकूण 3 लोकांना सोडले होते त्यातील ऋषभ सचदेवा हे एक होते आणि त्याचे नाव पुढे येताच मोहित कंबोज हे बिथरले आहेत. मात्र ते 1100 कोटींचा बँक फ्रॉड मधील माणूस असून याबाबत आपण सर्वकाही समोर आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मी या प्रकरणात राजकारण आणत नाहीये त्यामुळे मी यात भाजपच्या विरोधात नसून या फ्रॉड लोकांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे भाजपनेही या फ्रॉड लोकांना वाचवू नये हे मी त्यांना आव्हान करत असून ही लढाई भाजप विरुद्ध नसून ड्रग्ज माफिया आणि हाय प्रोफाइल लोकांना मुद्दाम अडकविणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात नवाब मलिक यांनी विविध खुलासे करताना सॅम डिसोझा हा एका मोठ्या प्रकरणात आरोपी असून त्याचे खरे नाव सॅनविल डिसोझा आहे. तो 23 जून पासून फरार असून आत्तापर्यंत तो अटक का नाह असा उपस्थित केला आहे आणि याचे कारण एनसीबी अधिकारी व्हीव्ही सिंग आणि सॅम उर्फ सॅनविल डिसोझा व वानखेडे याचे असलेले संबंध असल्याने हा फरार आरोपी असून हा एनसीबीला क्लीनचिट देतोय? वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीत पत्रकार आणि वकील सुद्धा सामील आहेत. नंबियार आणि बजाज हे लोकांना धमकावून मुंबईत वसुलीची कामे करतात.
मी कुणाला बदनाम करण्यासाठी हे दाखवत नसून जो खेळ वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीने सुरू केला आहे त्याचा फक्त मी पर्दाफाश करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.