navratri festival – केडगाव-बोरीपार्धी येथील महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना, हनुमान तरुण मंडळाच्या नवरात्रोत्सवाचे 48 व्या वर्षात पदार्पण



दौंड : दौंड तालुक्यातील बोरीपार्धी-केडगाव स्टेशन येथील हनुमान तरुण मंडळाच्या महालक्ष्मी नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली असून येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये  उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हनुमान तरुण मंडळाचे हे उत्सव साजरा करण्याचे ४८ वे वर्ष असून मंडळातर्फे महालक्ष्मी मंदिराचे २००७ सालामध्ये जिर्णोद्धार करुन आलिशान मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवामध्ये येथील महालक्ष्मी मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेस आरती केली जाते. यावेळी या परिसरातील महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात.

या मंडळाची स्थापना १९७४ साली स्व.शांतिभाऊ पोखरना, स्व.सतीश शहा, डॉ राधाकृष्ण लवंगरे, स्व.धोंडीबा सुलाखे, बबन राव देशमुख, शिवाजीराव निंबाळकर, ईश्वरलाल गांधी यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. वरिष्ठांनी सुरु केलेले कार्य आजही शिवाजीराव निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली निरंतर चालू असून शिवाजीराव गरदडे हे उपाध्यक्ष, भास्कर नेवसे सचिव, मनोज पोखरना खजिनदार म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत.

 मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना रफीकभाई शिकिलकर, नरेंद्रशेठ कुलथे, शरद नेवसे, रविकांत जराड, रामभाऊ जाधव संजूकाका देवधर, गुलाबराव मेमाणे, अभयशेठ पितळे यांचे आनमोल मार्गदर्शन लाभत आहे.