ए आवाज खाली करा, चला निघा इथून… खासदार नवनीत राणा यांची मुंबई पोलिसांना अरेरावी

मुंबई : आज मुंबईत घडत असलेल्या घटनांवरून महाराष्ट्राचं राजकारण हे दूषित होत असल्याचं पहायला मिळत आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे म्हणत मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यातच राणा दांपत्याने चिथावनीखोर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस त्यांच्या निवास्थानी गेल्यानंतर त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि ए आवाज खाली करा, चला बाहेर व्हा असे पोलिसांना चढ्या आवाजात बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेण्याची घोषणा केली मात्र त्यांच्या घरी पोलीस आल्यानंतर मात्र तेथील वातावरण तप्त होऊन हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. राणा दाम्पत्य मुंबई पोलिसांवर चांगलंच भडकलं. कारण राणा दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलीस त्यांना घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा राणा यांनी पोलिसांसोबत जाण्यास नकार दिला आणि आधी वॉरंट दाखवा नंतरच आम्ही तुमच्यासोबत येऊ असं म्हणाल्या.
यावेळी खासदार नवनीत राणा यांनी संताप व्यक्त करत ए चला बाहेर. आवाज खाली करा, अशा शब्दात पोलिसांवर संतापल्याचे दिसत असून आम्ही लोक प्रतिनिधी आहोत तुम्ही आम्हाला हात लावू शकत नाही अश्या पद्धतीने नवनीत राणा पोलिसांना दम टाकत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
सध्या मुंबईत सुरु असलेल्या गदारोळावरून भाजप शिवसेनाला जबाबदार म्हणतंय तर शिवसेना भाजपवर निशाणा साधत आहे.