Categories: मुंबई

अखेर खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक! आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाण्याची शक्यता

मुंबई : मुंबईत येऊन मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अखेर खार पोलिसांनी अटक केली आहे.
खार पोलिसांनी त्यांच्यावर कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत आल्यानंतर शिवसैनिक चांगलेच भडकले होते. शिवसैनिकांनी राणा यांच्या निवास्थानाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरु केल्याने वातावरण चांगलचं तापलेलं होतं.
या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही मातोश्रीवर जाणार नसल्याचं सांगत, आपले आंदोलन रद्द केले. माध्यमांसमोर त्यांनी तशी घोषणा देखील दिली. यानंतर आता शिवसेनेकडून त्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये पत्रकारपरिषद घेत राणा दाम्पत्य आणि भाजपावर जोरदार टीका केली असून पोलीस त्यांना आणायला गेले असता त्यांनी पोलिसांना दमबाजी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago