आमदार ॲड.राहूल कुल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी होणार

मुंबई : आज दिनांक २५ जून रोजी विधान भवनात महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची महत्त्वपूर्ण कामकाज बैठक पार पडणार असून सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष ॲड.राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीमध्ये सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार ॲड.राहुल कुल यांच्यासह पंधरा आमदार उपस्थित राहणार असून यामध्ये नवी मुंबई विमानतळाच्या कामकाजाचा दर्जा आणि प्रगतीबाबत आढावा घेतला जाणार आहे.

या बैठकीत विविध विषयांवरही सखोल चर्चा करण्यात येणार असून बैठकीनंतर संध्याकाळी पाच वाजता सार्वजनिक उपक्रम समिती अध्यक्ष ॲड.राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विमानतळाची पाहणी करण्यात येणार आहे.