| सहकारनामा |
पुणे : पेट्रोल, डिझेलमध्ये झालेली मोठी दरवाढ आणि महागाईच्या विरोधात आज संपूर्ण राज्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडकून आंदोलन, निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी महिलांनी आपल्या हातामध्ये ‛कोरोनाने वाचलो अन महागाई ने मेलो,’ हमे आपके अच्छेदिन नही चाहीये, हमारे वो पुराने बुरे दिन हि लौटा दो असे फलक झळकावले आहेत.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचं ,अच्छे दिन च स्वप्न दाखवलं. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे अशी जोरदार टीका केली आहे.
आजच्या आंदोलणाबाबाबत रुपाली चाकनकर यांनी माहिती देताना सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्र सरकारचा, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी पुणे शहरातही आज आंदोलन केले यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, महिला शहराध्यक्ष मृणालिणी वाणी, नगरसेवक सचिन दोडके, युवक अध्यक्ष महेश हांडे, भावना पाटील, पुनम पाटील, अनिता पवार, श्वेता होनराव व महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गॅस सिलिंडरचे व टू व्हिलर गाडीचे श्राद्ध घालत निषेध नोंदविण्यात आला.