Categories: Previos News

National : ‛या’ कारणामुळे संसद अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार – खा.सुप्रिया सुळे यांची माहिती



नवी दिल्ली : सहकारनामा

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व विरोधी पक्षांनी माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

याबाबत त्यांनी माहिती प्रसिद्ध करताना केंद्र सरकार ज्या असंवेदनशीलतेने शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळत आहे, त्याचा आम्ही सर्वजण निषेध करीत आहोत. केंद्र सरकारने नवे तीन कृषी कायदे केले आहेत.

ते मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी गेली दोन महिने ते दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. परंतु सरकार त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नाही,ही अतिशय खेदाची बाब आहे. याशिवाय केंद्र सरकार नवे कामगार विधेयक आणत आहे.त्यावरही सविस्तर चर्चा व्हायला हवी अशी आमची ठाम मागणी आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी व कामगारांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या विरोधी पक्षाचे एकही सदस्य दिल्लीत जाणार नाहीत. जे अगोदरच दिल्लीत पोहोचले असतील ते संसदेत जाणार नाहीत. आपल्या महाराष्ट्रातही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. हजारो शेतकरी यासाठी मुंबईत जमा झाले. या आंदोलनास आदरणीय शरद पवार साहेब देखील उपस्थित होते. हे आंदोलन अतिशय शांततेत पार पडले.

त्याउलट गुप्तचर खात्याने आंदोलनात गोंधळ होऊ शकतो असा अहवाल देऊन देखील केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर काहीही खबरदारी घेतली नाही, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे त्यांनी म्हणत कोणत्याही प्रकारची हिंसा समर्थनीय नाहीच पण सरकारनेही अहंकार सोडून हा प्रश्न सुटावा यासाठी सकारात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे.

उद्या सभागृहात जाणार नसलो तरी राष्ट्रपतींचे अभिभाषण वगळता पुढील सर्व दिवस आमची सभागृहात अतिशय सक्रीय उपस्थिती असणार आहे.ज्या विश्वासाने जनतेने आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले आहे, तो सार्थ ठरविण्यासाठी काम करण्याचा मी प्रांजळ प्रयत्न करीत आहे असे शेवटी त्यांनी म्हटले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago