(Nashik Oxygen Tank Leak) धक्कादायक – ऑक्सिजनची गळती झाल्याने नाशिक महापालिका रुग्णालयातील 11 रुग्णांचा मृत्यू ! मृतांचा आकडा वाढण्याची भीती



| सहकारनामा |


नाशिक : नाशिक च्या महापालिकेतील झाकीर हुसेन रुग्णालयात अचानक ऑक्सिजनच्या टाकीमधून (Nashik Oxygen Tank Leak) ऑक्सिजनची गळती होऊन 11 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. 

ही आक्सिजन लिक होण्याची दुर्घटना कशी आणि का घडली याबाबत आता चौकशी होणार असून सध्या ऑक्सिजनचे लिकीज थांबविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना रुग्णांना वाचविण्यासाठी ऑक्सिजनची अत्यावश्यक गरज भासत आहे. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा साठा आहे त्या ठिकाणी अशी घटना होणे म्हणजे दुर्दैवच मानले जात आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये आत्तापर्यंत 11 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती समोर येत असली तरी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाकडून या टाकीमधील गळती थांबवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. हि घटना (Nashik Oxygen Tank Leak) नाशिक शहरातील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 वाजण्याच्या घडली असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी ऑक्सिजनची गळती सुरू झाली त्यावेळी अगोदर तर नेमके काय झाले आहे हे लवकर कुणाला समजत नव्हते मात्र काही वेळात हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आल्याने ही गळती थांबवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली आणि हे लिकीज कसे थांबवायचे यासाठी प्रयत्न सुरू आहे.

मात्र हे सर्व सुरू असताना (Oxygen Tank Leak) ऑक्सिजन टॅंक झाल्याने रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू लागला आणि या रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 150 रुग्णांना त्याचा थेट फटका बसू लागला. यात 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असली तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

22 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago