|सहकारनामा|
दौंड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजामध्ये शत्रुत्वाची व द्वेषाची भावना निर्माण होईल असे विधान केल्याने दौंड शिवसेनेच्या वतीने राणे यांचा निषेध करण्यात येऊन राणे यांच्या फलकास जोडे मारण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले.
नारायण राणे यांनी रायगड येथील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त करीत निषेध नोंदविला आहे. ठाकरे यांच्या कानाखाली मारली पाहिजे अशी भाषा राणे यांनी वापरून मुख्यमंत्री ठाकरे यांची बदनामी केली आहे, समाजामध्ये तेढ निर्माण केली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. राणे यांच्या फलकाला जोडे मारीत शिवसैनिकांनी राणे विरोधात शिवराळ भाषेत घोषणा दिल्या.
शिवसेनेचे शहराध्यक्ष आनंद पळसे, शिवाजी मोरे, चांद बादशहा शेख, अजय कटारे, प्रसाद कदम, दुर्गा सोनवणे, चेतन लवांडे, अक्षय घोलप, गणेश झोजे, निलेश झोजे, दत्तात्रय मधुरकर, अजित फुटाणे, निखिल पळसे, गुलाब जमादार, नवनाथ सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.