दौंड : न्यू इंग्लिश स्कूल नानगाव (ता. दौंड) च्या सन २००६-२००७ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा तब्ब्ल १६ वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा केला. हा स्नेह मेळावा दि.9 जुलै रोजी निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या मेहेर रिट्रीट खुटबाव या ठिकाणी पार पडला.
सोळा वर्षांनी पुन्हा एकदा हे शालेय मित्र भेटत असल्याने त्यांनी अगोदर स्वतःचा परिचय करून दिला. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षिका बोरकर म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने आज मला माझ्या लेकी आणि लेक भेटले आहे. गुरु विना शिष्य नाही व शिष्यविना गुरु नाही. खूप दिवसानंतर तुम्हाला सर्वांना पाहून खूप आनंद झाला आहे.
शिक्षक चौधरी म्हणाले की, खरे तर आमच्यासाठी हा सुखद धक्का आहे. विशेष म्हणजे आमच्या बरोबर उपस्थितामध्ये आमचे काही माजी विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. अनेक दिवसांनी एकत्र आल्याचा आनंद आहे. सर्वांसाठी हा क्षण आनंदाचा अविस्मरणीय क्षण आहे. यापुढे दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा व्हावा असे वाटते.
शिक्षक कोळी म्हणाले की, एवढ्या दिवसानंतर सर्व विद्यार्थ्यांना भेटून आनंद झाला. यावेळी त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना आपण स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा ओघ वाढवावा असे सांगितले.
या कार्यक्रमाला शिक्षक धाईंजे यांना वयक्तिक अडचणीमुळे येता आले नाही मात्र त्यांनी दूरध्वनीवरून स्नेह मेळावा कार्यक्रमाला आलेल्या विध्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या . तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्नेह मिलन कार्यक्रमाला निमंत्रण दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी शाळेच्या दिवंगत शिक्षकांना सर्वांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व जमलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओसिम पठाण यांनी केले तर सूत्रसंचालन मेघा कुंभार व दिपक पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन करणारे ओसिम पठाण, रोहन मोटे, अजय खळदकर, विकास पवार, विकास रासकर, सागर खळदकर, श्रीकांत ससाणे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले. ‘वंदे मातरम’ राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.