केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक सहा (केडगाव गावठाण) मधील इच्छुक उमेदवारांची नावे पुढे आली असून यामध्ये ‘कुल’ आणि ‘थोरात’ गटातील एकूण एकोणीस नावे पुढे येत आहेत. या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष एक जागा, सर्वसाधारण महिला एक जागा आणि इतर मागासवर्गीय एक अश्या तीन जागेसाठी निवडणूक होणार आहे.
कुल गट | सर्वसाधारण पुरुष – अभिजित गायकवाड, निलेश कुंभार, प्रवीण नामदेव धुमाळ, सुभाष कडू
सर्वसाधारण महिला – मनिषा संतोष शेंडगे, पूनम अशोक शेंडगे,
ओबीसी महिला – सुजाता हनुमंत जगताप ही नावे कुल गटातून समोर येत आहेत तर
थोरात गट – सर्वसाधारण पुरुष – ज्ञानदेव गायकवाड, गिरीश कांबळे, रोहित गजरमल, संतोष पांडुरंग देशमुख, दत्तात्रय तुळशीराम कडू
सर्वसाधारण महिला – स्नेहा चंद्रकांत गजरमल, रुपाली संदीप गोरगल, शेंडगे वस्ती
ओबीसी महिला – सोनाली सुधीर गायकवाड, संध्या ज्ञानेश्वर गदादे, शितल संदीप जगताप, सारिका संपत जगताप यांची नावे पुढे येत आहेत.
कुल आणि थोरात गटाकडून एकूण तीन जागेसाठी एकोणीस उमेदवार इच्छुक असून यातील कोणत्या उमेदवारांना संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आरोप प्रत्यारोप – केडगाव गावठाण हे केडगावचे उगमस्थान आहे. या गावात मागील पाच वर्षे कुल गटाचे सरपंच पद होते मात्र या गावठाणातील परिस्थिती बदलली नसल्याचा आणि कोणताच विकास झाला नसल्याचा आरोप थोरात गटाकडून करण्यात येत आहे. मागील काळात झालेली निकृष्ठ कामे आणि त्यानंतरच्या पाच वर्षे सरपंच पदाच्या काळात जाणून बुजून रखडवलेली कामे, तोंड पाहुण काम करणे, दुसऱ्यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे स्वतः श्रेय घेणे, जाणून बुजून मुख्य रस्त्यांची कामे न करणे या मुद्दयांवर थोरात गट प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार असल्याचे बोलले जात आहे. तर केडगाव गावठाणात खूप मोठ्या प्रमाणावर विकास झाला, रस्ते झाले, सर्वत्र विकासच विकास झाला हा मुद्दा सरपंच पद भूषविलेल्या कुल गटाकडून करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.