नागपूर च्या रसायन कंपनीत स्फोट, 9 जणांचा मृत्यू

नागपूर : राज्यात सध्या विविध कारखाने, कंपन्यांमधील रसायनांचे स्फोट होऊन जीवित हानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना नागपुरमधील एका कारखान्यात घडली असून  एक्सप्लोझिव कारखान्यात हा स्फोट झाल्याची माहिती मिळत  आहे. या स्फोटामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजत आहे. या वृत्ताला एएनआय (ANI) ने दुजोरा दिला आहे.

स्फोट झालेल्या या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर दारूगोळा तसेच रसायने असल्यामुळे मृतांचा आकडा वाढला असल्याचे सांगितले जात आहे.
या स्फोटामुळे एक इमारत उध्वस्त झाल्याचे दिसत आहे.

सोलार एक्सप्लोझीव्ह कंपनीच्या स्फोटातील मृतकांची नावे पुढील प्रमाणे आहेत
1 युवराज किसनाजी चारोडे बाजारगांव
2 ओमेश्वर किसनलल मछिर्के चाकडोह,
3 मिता प्रमोद उईके, अंबाडा सोनक काटोल,
4 आरती निळकंठा सहारे कामठी ,
5 श्वेताली दामोदर मारबते, कन्नमवार ग्राम, वर्धा,
6 पुष्पा श्रीरामजी मानापुरे, शिराळा, अमरावती,
7 भाग्यश्री सुधाकर लोणारे, भुज ब्रम्हपुरी ,
8 रुमीता विलास उईके, ढगा वर्धा,
9 मोसम राजकुमार पटले, पांचगांव भंडारा.

अशी मृतांची नावे सांगितली गेली आहेत.