दौंड नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, मनासारखे आरक्षण मिळाल्याने आजी-माजी नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण… वाचा संपूर्ण विश्लेषण

अख्तर काझी

दौंड : शहरातील मुख्य गावठाण व बाजारपेठेतील प्रभागांमध्ये सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्याने येथील सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दौंड शहरातील राजकारणातील मोठ्या नेत्यांच्या प्रभागांमध्ये (सुरक्षित) नेमके कोणते आरक्षण पडते याची सर्वच पक्ष्यांना उत्सुकता होती. मात्र आपापल्या नेत्यांना अपेक्षित असलेले आरक्षण मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. आता या प्रभागांमधून पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी नेमके कोण-कोण बाजी मारतात याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे. या प्रभागांमध्ये तिकीट वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिक हित संरक्षण मंडळ या दोन्ही गटांना मोठ्या राजकीय पेचांचा सामना करावा लागणार आहे.

दौंड नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एक प्रभागाची वाढ झाली असून आता दौंड नगर परिषदेसाठी प्रभाग संख्या एक ने वाढली असून एकूण १३ प्रभाग असणार आहेत, प्रत्येक प्रभागात दोन सदस्य याप्रमाणे एकूण २६ सदस्य  असणार आहेत. दौंड नगरपरिषद हद्दीमध्ये ४९ हजार ४५० लोकसंख्या असून यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ११४५४ असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या १२३९ आहे. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार प्रभाग क्रमांक १,२,६,७,८,९ मध्ये अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव असणार आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

दौंड नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्या उपस्थित दौंड नगरपरिषदेच्या टाऊन हॉल मधील कार्यालयात पार पडली. या आरक्षण सोडती वर आक्षेप नोंदवण्यासाठी १५ ते २१ जून अशी मुदत असल्याची माहिती निर्मला राशिनकर यांनी दिली असून नागरिकांना कार्यालयीन वेळेत मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्याकडे लेखी स्वरूपात हरकती नोंदवता येणार आहेत.

दौंड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणाची प्रभागनिहाय सोडत पुढील प्रमाणे :– प्रभाग क्रमांक १, १अ  अनुसूचित जाती सर्वसाधारण, १ ब सर्वसाधारण महिला.

 प्रभाग क्रमांक २, २अ अनुसूचित जाती महिला, २ ब सर्वसाधारण. 

प्रभाग क्रमांक ३, ३अ सर्वसाधारण महिला, ३ब  सर्वसाधारण, 

प्रभाग क्रमांक ४, ४अ सर्वसाधारण महिला, ४ ब सर्वसाधारण.

 प्रभाग क्रमांक ५, ५अ सर्वसाधारण महिला, ५ ब सर्वसाधारण. 

प्रभाग क्रमांक ६, ६अ अनुसूचित जाती सर्वसाधारण, ६ ब सर्वसाधारण महिला.

 प्रभाग क्रमांक ७, ७अ अनुसूचित जाती महिला, ७ ब सर्वसाधारण. 

प्रभाग क्रमांक ८, ८अ अनुसूचित जाती महिला, ८ ब सर्वसाधारण. 

प्रभाग क्रमांक ९, ९अ अनुसूचित जाती सर्वसाधारण, ९ब सर्वसाधारण महिला. 

प्रभाग क्रमांक १०, १० अ सर्वसाधारण महिला, १० ब सर्वसाधारण. 

प्रभाग क्रमांक ११, ११अ सर्वसाधारण महिला, अकरा ब सर्वसाधारण, 

प्रभाग क्रमांक १२, १२अ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, १२ब सर्वसाधारण महिला. 

प्रभाग क्रमांक १३, १३अ सर्वसाधारण महिला, १३ब सर्वसाधारण.