Categories: राजकीय

मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी दौंडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

दौंड : बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने आघाडीच्या वतीने, मुस्लिम समाजाच्या संवैधानिक हक्क अधिकारांसाठी दौंड मध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या 5 टक्के आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, वंचित बहुजन आघाडीने दिलेले मोहम्मद पैगंबर बिल पास करावे तसेच वंचित च्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आल्याचे वंचित चे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी सांगितले. मुस्लिम समाज,भिमक्रांती सेनेच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
मुस्लिम समाज वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्यावर अनधिकृत कब्जा करण्यात आला आहे, हा कब्जा उठवुन या जमिनीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा, समाजाच्या उन्नतीसाठी अनेक वेळा आयोग नेमण्यात आले आहेत, परंतु आज पर्यंत आयोगाने जो जो अहवाल सादर केला त्याकडे शासनाने प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मुस्लिम समाजाशी दुजाभाव केला आहे असे अश्विन वाघमारे यावेळी म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अजिंक्य गायकवाड, एड.किरणलोंढे,अक्षय शिखरे,राहुल नायडू,बबलू जगताप,राजेश ओव्हाळ,प्रवीण भालेराव तसेच भिमक्रांती सेनेचे बंटी वाघमारे रितेश सोनवणे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

12 मि. ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago