Categories: Previos News

पाटस ते कुरकुंभ येथील साईड पट्ट्यावर टाकलेला ‘मुरूम’ थेट पुणे-सोलापूर महामार्गावर.. वाहन चालक अपघातातून थोडक्यात बचावला, मुरुमाच्या रॉयल्टीचा प्रश्न ऐरणीवर

दौंड : दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या पाटस ते कुरकुंभ या गावांच्या दरम्यान महामार्गाच्या साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात मुरुमाचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. साईडपट्टीवर टाकण्यात आलेला हा मुरूम थेट रस्त्यावर आल्याने हनुमंत शितोळे हे वाहन चालक अपघात होता होता थोडक्यात बचावले असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

याबाबत पाटस येथील वाहन चालक हनुमंत शितोळे यांनी अधिक माहिती देताना, ते पुणे-सोलापूर महामार्गावरून कुरकुंभ घाटातून जात असताना त्यांची गाडी तेथे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुमावरून घसरली. गाडी घसरल्याने त्यांचा रस्त्यावर तोल जाऊन ते पडणार तोच त्यांनी कशीबशी गाडी सावरत ती रस्त्याच्या बाजूला घेतली आणि रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांना पुणे सोलापूर महामार्गावर सर्वत्र मुरुम आणि मुरुमाचे मोठ मोठे खडे रस्त्यावर विखूरल्याचे दिसले. त्यांनी याचे व्हिडीओ आणि फोटो काढले.

त्यानंतर त्यांनी तेथील सर्कल भाऊसाहेब यांना येथे टाकण्यात आलेल्या या मुरुमाच्या रॉयल्टीबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांना त्याबाबत योग्य ती माहिती मिळू शकली नाही. नंतर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी दौंडचे तहसीलदार साहेबांना संपर्क साधला असता येथे मुरूम टाकण्यासाठी कोणी अश्या प्रकारच्या मुरुमाच्या रॉयल्टीची मागणी केल्याचे आढळून येत नाही अशी माहिती तहसीलदारांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे येथे टाकण्यात येत असलेला मुरूम हा संबंधित कंपनीने रॉयल्टीचे आदेश घेऊन रॉयल्टीची रक्कम भरली आहे का? संबंधित कंपनीने येथे मुरूम टाकण्याचे कंत्राट देताना याच्या रॉयल्टीची माहिती घेतली का किंवा रॉयल्टी काढल्यानंतर त्या वाहनाचे नंबर, पावती इत्यादी बाबी टोल प्रशासनाकडे उपलब्ध आहेत का आणि जर असेल तर त्याची माहिती त्यांनी द्यावी अशी मागणी शितोळे यांनी केली असल्याची माहिती शितोळे यांनी ‘सहकारनामा’ला दिली आहे.

याबाबत पुणे-सोलापूर महामार्गावर टाकण्यात आलेल्या या मुरुमाची रॉयल्टी काढण्यात आली आहे का याच्या माहितीसाठी पाटस टोल चे व्यवस्थापक अजयसिह यांना संपर्क साधला असता, हा मुरूम आम्ही कंत्राटदारामार्फत टाकण्यास सांगितला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र येथे या मुरुमाची रॉयल्टी काढली का आणि काढली असेल तर त्याची माहिती मिळावी अशी मागणी त्यांना केली असता, आम्ही ज्यांना मुरूम टाकण्याचे काम (कंत्राट) दिले आहे त्यांना त्याबाबत माहिती असेल, आम्ही काम पूर्ण झाल्यावर त्याचे बिल काढत असतो, त्यात सर्व बाबी नमूद केलेल्या असतात अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच हा मुरूम टाकण्यासाठी कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिले होते, ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी या मुरुमाची रॉयल्टी काढली का नाही याची माहिती त्यांना विचारली असता या प्रश्नावर त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळाले नाही.

माहिती घेऊन कारवाई करणार : दौंड तहसीलदार

या सर्व प्रकाराबाबत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना संपर्क साधला असता, पुणे सोलापूर महामार्गावर मुरूम टाकण्यासाठी कुणीमुरुमाची रॉयल्टी मागितल्याचे आढळून येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी महसूल पथक पाठवून माहिती घेतली जाईल आणि गैर प्रकार आढळल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago