Categories: Previos News

Murder : यवत जवळ एकाचा ‛खून’, यवत पोलीसांचे नागरिकांना आवाहन



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील यवतजवळ असणाऱ्या जावजीबुवाची वाडी येथील मंदिराच्या पाठीमागे होलेवाडी रस्त्यालगत एका इसमाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या बाबत यवत पोलीस ठाण्यात भा.दं.वि.का.क.३०२,२०१. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून 

गणेश उत्तम वेताळ (वय.४१ वर्षे धंदा.शेती रा.सहजपुर ता.दौंड, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.०९/०३/२०२१ रोजी ०८:००वा. चे पुर्वी सहजपुर ता.दौंड, जि.पुणे या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जावजीबुवाचे मंदीराच्या मागे होलेवाडीकडे जाणाऱ्या  रोडच्या कडेला एका पुरुषाचा खून करून त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला असल्याची घटना घडली आहे.

या खून झालेल्या पुरुषाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून त्याची दाढी पांढरी, मिशा बारीक, गळयात काळे रंगाचा धागा, उजवे हाताचे मनगटावर पिवळे लाल रंगाचा धागा, उजवे हाताचे अंगठया शेजारचे बोटात पिवळसर धातुची अंगठी व मधले बोटात तांब्याचे धातुची गोल अंगठी, कमरेला लाल

रंगाचा दोन पदरी धागा, उजवे पायात काळे रंगाचा दोन पदरी धागा, अंगात राखाडी रंगाची अंडरवेअर असे वर्णन आहे.

खून झालेल्या व्यक्तीची ओळख अजून पटली नसून या व्यक्तीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशानेतरी मारहाण करून जिवे ठार मारून त्याचे प्रेताची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने रोडचे कडेला टाकुन दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

या व्यक्तीबाबत अधिक माहिती मिळाल्यास नागरिकांनी  ल०२११९-२७४२३३ कंट्रोल रूम ०२०-२५६५७१७१, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील – ९८२३२४२९९९, 

पो.उप.निरीक्षक संजय नागरगोजे – ९४०४९६९००५, यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

8 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago