Categories: क्राईम

खून | रशीने गळा आवळून, करंट देऊन विवाहितेचा खून | पारगाव जवळच्या रांजणगावमधील भयानक घटना

अब्बास शेख

पुणे : दौंड तालुक्यातील पारगाव जवळ असणाऱ्या रांजणगाव (ता.शिरूर) येथे दि. 3 जुलै रोजी एक भयानक घटना घडली आहे. शितल स्वप्नील रणपिसे या 23 वर्षीय विवाहितेचा तीच्या राहत्या घरात रशीने गळा आवळून आणि वायरने करंट देऊन खून करण्यात आला आहे. याबाबत शितलचा पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय 27 रा. रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे) याने फिर्याद दिली असून यवत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत शिरूर पोलिस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग केला आहे.

पुढील लिंकवर जाऊन आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – https://youtube.com/@sahkarnama?si=iK3kNC3gd3dM5GWE

मिळालेल्या माहितीनुसार दि. 3 जुलै रोजी मयत शितलचा पती स्वप्नील हा दुपारी दोन वाजता कामावरून घरी आल्यानंतर त्याची पत्नी पत्नी शितल स्वप्निल रणपिसेवय (वय 23 वर्षे रा. राजणगाव सांडस ता. शिरूर जि.पुणे) हि घरामध्ये मृत अवस्थेत आढळली. तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तिने अज्ञात कारणावरून तिचा निळ्या रंगाच्या रशीने गळा आवळुन व काळया रंगाच्या वायरने विजेचा करंट देवून तिचा खून केला असे फिर्यादी स्वप्नील रणपिसे याने आपल्या फिर्यादित म्हटले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्यावेळी शितल हिचा खून झाला त्यावेळी स्वप्नील हा कामावर गेला होता तर तीचे सासरे हे काष्टी ला गेले होते तर तीची सासू ही त्यांच्या कापड दुकानात गेली होती अशी माहिती दिली जात आहे.

शितल चा खून कोणी आणि का केला याबाबत आता शिरूर पोलिस अधिक तपास करत असून झालेल्या प्रकारामुळे रांजनगावमध्ये एकच खळबळ माजली आहे. सदरील गुन्हा हा आता यवत पोलिसांकडून शिरूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago