Categories: क्राईम

सहा महिन्याच्या चिमुकल्याचा जीव घेऊन काय मिळालं ! निर्दयी आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु

Crime News

पुणे : शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून त्यामुळे शिरूर परीसरात खळबळ माजली आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एका सहा ते सात महिन्याच्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून या मुलाच्या नाका-तोंडावर कशानेतरी मारून त्याचे नाक फ्रॅक्चर करून नंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे तपासात पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या अगोदर (नक्की वेळ माहित नाही) कारेगाव गावच्या हद्दीत पुणे ते अहमदनगर हायवे रोडलगत रमेश संभाजी जासुद (रा.चव्हाणवाडी, करडेरोड ता. शिरुर जि.
पुणे) यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी सहा ते आठ
महिन्याच्या बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून त्या बालकाच्या नाकावर कशानेतरी मारुन फ्रॅक्चर करुन त्याचा गळा दाबुन खुन केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास विहिरीतील पाण्यात टाकुन दिले होते.

खुनाची ही घटना उघडकीस आल्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस हवालदार वैजनाथ नागरगोजे यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई रोकडे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago