Categories: Previos News

MURDER – दौंडच्या जावयाने केला पुरंदरच्या सासऱ्याचा खून, LCB ने सापळा रचून केले जेरबंद



पुणे : सहकारनामा ऑनलाईन 

दौंड तालुक्यातील मिरवडी येथे राहत असलेल्या युवकाने नाझरे सुपे ता. पुरंदर येथील आपल्याच सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हा खून करून फरार झालेल्या जावयाला स्थानिक गुन्हे शाखा LCB ने अखेर आज जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 ऑगस्ट रोजी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत पुणे ते सोलापूर रोडने LCB पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून जेजुरी पोस्टे गुरनं 291/2020  भादवि क. 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी  सुरेश सदाशिव भोसले (वय 40 वर्षे रा मिरवडी ता. दौंड जि. पुणे) याने आपले बायकोच्या माहेरी नाझरे-सुपे ता. पुरंदर जि.पुणे येथे जाऊन बायको आपल्याकडे नांदायला येत नाही म्हणून चिडून जाऊन भांडण करून त्याचे सासरे  किसन देशा काळे (वय 60 वर्षे) यांना चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारून पळून गेला होता. 

आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी त्यास मौजे मिरवडी ता. दौंड येथून सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास पुढील तपासकामी वैद्यकीय तपासणी करून जेजुरी पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सफौ.दत्तात्रय जगताप , श्रीकांत माळी, चापोहवा राजापूरे, पोना विजय कांचन ,पो शि धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके यांनी केली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago