Categories: Previos News

Murder in Pune – पुण्यात ‛खून’ सत्र सुरूच! टोळक्याकडून तलवार, कोयत्याने दोघांवर सपासप ‛वार’, एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी



| सहकारनामा |

पुणे : पुणे तिथे काय उणे अशी म्हण आहे आणि या म्हणीचा अर्थ पुण्यात सर्वच मिळते, इथे कोणत्याच गोष्टीची उणीव भासत नाही. मात्र सध्या या पुण्याला खून (Murder) सत्राने चांगलेच बेजार केले असून पुणे शहर आणि आसपास दररोज कुठे न कुठे खूनाच्या घटना घडत असल्याने पुण्याच्या चांगुलपणाला गालबोट लागत आहे.

काल एका पोलीस हवालदाराचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा दोघांवर तलवार आणि कोयत्याने वार करण्यात आले यात एकजण जागीच ठार (Murder in Pune) झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. शाम सोनटक्के असे 24 वर्षीय खून झालेल्या तरुणाचे नाव असून योगेश चव्हाण हा 19 वर्षीय युवक जखमी झाला आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार वरील दोघेजण हे आपल्या इतर मित्रांसोबत दारू पिण्यासाठी एका जागेवर जमले होते त्याच वेळी तेथे त्यांच्याशी जुना वाद असणाऱ्या दुसऱ्या टोळक्यातील मोन्या पोळेकर याने तेथे येऊन त्यांना शिवीगाळ करत तुम्हाला लय मस्ती आली आहे का रे, माझ्याकडे खुनशीने पाहता काय रे असे म्हणत शिवीगाळ केली आणि  तलवार आणि कोयत्याने सपासप वार करून शाम याचा खून केला तर दुसरा मित्र योगेश हा जबर जखमी झाला आहे. हि घटना सिंहगड रोड परिसरात घडली आहे.

घटना घडताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या ठिकाणी भेट देऊन आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहे. या घटनेचा अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago