अब्बास शेख
दौंड : दौंड शहरामध्ये शनिवारी रात्री एक भयानक घटना घडली असून एक वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून 27 वर्षीय युवकाचा आरोपिंनी धारदार शस्त्र आणि दगड, विटांनी मारहाण करून खून करण्यात आला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार केतन सुडगे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो 27 वर्षांचा होता. बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपिंनी शनिवारी रात्री केतन सुडगे याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसले त्यानंतर त्याच्यावर दगड, विटांनी हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यात केतन हा गंभीर जखमी होऊन मृत पावला आहे.
गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशीच अशी भयंकर घटना घडल्याने दौंड शहरात खळबळ माजली आहे. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सहकारनामाशी बोलताना दिली आहे.