Categories: क्राईम

किरकोळ कारणावरून ‘खून’, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड : किरकोळ कारणावरून भांडणे होऊन यात एकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना दौंड जवळील मलठण येथे घडली आहे. याबाबत हर्षदा नारायण डोईफोडे (रा.मूळ मलठण ता.दौंड ) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिसांनी आरोपी अमोल सुनिल लवंगरे (रा.मलठण, ता.दौंड) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. ११/१२/२०२२ रोजी रात्री १०:०० वाचे सुमारास मलठण येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरी त्यांचे पती नारायण लक्ष्मण डोईफोडे व अमोल सुनिल लवंगरे (रा. मलठण, ता. दौड) यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरुन त्यांच्यामध्ये
भांडणे झाली. या भांडणामध्ये अमोल सुनिल लवंगरे याने कोणत्यातरी हत्याराने फिर्यादी यांचे पती नारायण लक्ष्मण डोईफोडे यांना डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.

त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीस दौंड येथील सरकारी हॉस्पीटल मध्ये उपचारकामी नेले व तेथुन पुढील औषध उपचारकामी ससुन हॉस्पीटल पुणे येथे नेऊन अॅडमीट केले होते.
दिनांक १८/१२/२०२२ रोजी ससुन हॉस्पीटल
पुणे येथे उपचार चालु असताना फिर्यादी यांचे पती मयत झाले. त्यानंतर फिर्यादी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी मयत नारायण डोईफोडे यांचा रितीरिवाजानुसार अंत्यविधी करुन त्यांनी दौंड पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई गोसावी करत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago