Categories: क्राईम

यवत मध्ये महिलेचा खून, आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न यवत पोलिसांनी हाणून पाडला

दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला असून प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र यवत पोलिसांनी अखेर या खुनाला वाच्यता फोडली आहे. याबाबत पोलीस हवालदार प्रकाश कुंडलिक झेंडे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मोहमद रेहान मुस्ताक (वय 19 वर्ष राहणार – पचोर तालुका भिल्लोर जिल्हा कानपूर राज्य उत्तर प्रदेश) याने दिनांक 09/07/2024 रोजी रात्री 10:30 ते 11:00 च्या सुमारास
यवत गावच्या हद्दीत असणाऱ्या भवानीनगर येथे सारिका अर्जुन गायकवाड यांच्या सिमेंट पत्रा खोलीत त्याची पत्नी मणिका प्रसंथा जेना (वय 26 वर्ष सध्या राहणार भवानीनगर, यवत.मूळ रा. ओरीसा) त्याची पत्नी हिला भांडणाच्या रागातून तिचा गळा दाबून खून केला व तिने गळफास घेतला असे भासविण्यासाठी प्रेत ओढणीने पंख्याला लटकवले होते.

आरोपीने यवत पोलीस स्टेशनला येवुन पत्नीने आत्महत्या केली असल्याची खोटी तक्रार दिली मात्र यवत पोलिसांनी सखोल तपास करून ही आत्महत्या नसून खून असल्याचे तपासात निष्पन्न केले. यवत पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago