दौंड : दौंड कुरकुंभ मार्गावरील मेरगळ वाडी हद्दीत दौंड पोलिसांना एक बेवारस मृतदेह मिळून आला होता. मयताच्या डोक्यामध्ये मारहाणीच्या खुणा असल्याने हा घातपाता चा प्रकार दिसत आहे असा पोलिसांना संशय आला आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पोलीस पथकाने त्या दिशेने कौशल्यपूर्ण तपास करून सदरच्या खून प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपी उमेश गुरबळआप्पा बनजगोल (रा. गजानन सोसायटी, दौंड ) या आरोपीला अटक केली होती . सदरचा खून अनैतिक संबंधांमधून झाला आहे अशी कुणकुण पोलिसांना आधीपासूनच होती आणि तपासामध्ये ही पत्नी अश्विनी राजेंद्र शिंदे (वय 30,रा. वडार गल्ली ,दौंड) हिचा सहभाग आढळला. त्यामुळे दौंड पोलिसांनी दिनांक 12 एप्रिल रोजी तिला अटक केली . न्यायालयाने तिला दिनांक 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
या खून प्रकरणात बाबत अधिक माहिती अशी की, मयत राजेंद्र व त्याची पत्नी आरोपी उमेश याच्याकडे गवंडीकाम करावयाचे, आपल्या पत्नीने उमेश याच्याकडे काम करू नये यावरून त्यांच्यात सतत भांडणे व्हायची ही माहिती मयत राजेंद्र शिंदे यांच्या नातलगांनी दौंड पोलिसांना दिली होती. याचा धागा पकडीत दौंड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून दोघा आरोपींना अटक केली आहे. दि. 23 मार्च रोजी राजेंद्र यास आपल्या दुचाकीवर बसून मेरगळवाडी परिसरात नेऊन त्यास दारू पाजून त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या खून प्रकरणामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास दौंड पोलीस करीत होते आणि आज पोलिसांनी मयताच्या पत्नीस अटक केली आहे.