दौंड : यवत येथील पालखी तळावर झालेल्या खूनाचा तपास लावण्यात यवत पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक २७/०७/२०२२ रोजी संजय सखाराम बनकर (रा. तांबेवाडी खामगाव ता. दौंड जि. पुणे मुळ रा. मुरारजी पेठ, निराळे वस्ती महादेव मंदीराजवळ चिंचनगर सोलापुर) सकाळी ११:०० वा. चे पुर्वी यवत गावचे हददीत बाजार तळा जवळ असणाऱ्या पालखीतळ येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने छातीवर व छातीचे खालचे बाजुस वार करून खुन
केला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग
पुणे ग्रामीण हे करीत असताना अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांनी चार टिम तयार केल्या होत्या. त्यामध्ये पोलीस निरीक्षक नारायण पवार व डी. बी. पथकातील पोलीस
हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. तसेच आरोपी हा नेपाळ देशातील रहिवासी आहे व तो नेपाळला जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर आरोपीस पकडणे कामी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस पथक सहा. पोलीस निरीक्षक, केशव वाबळे, तसेच पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. सचिन घाडगे स्थानिक गुन्हे शाखा तसेच पो. ना. अक्षय यादव, पो. शि. बाराते, यांनी दोन दिवस दौड रेल्वे स्टेशन येथे सापळा लावला होता. दिनांक ०६/०८/२०२२ रोजी मध्यरात्री दौड रेल्वे स्टेशन येथुन खुनाच्या गुन्हयातील आरोपी राजबहादुर बालुसिंग ठाकुर उर्फ राजु सारखी (वय ४७ वर्षे रा. यवत ता. दौंड, जि. पुणे मुळ रा. पहाडीपुर नेपाळ) यास नेपाळला पळून जात असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याने सांगितले की मी पालखी तळावर बसलो असता एका इसमाने दारू पिवुन मला शिवीगाळ केली व माझे कानाखाली चापट मारली त्यामुळे मी चिडुन जावुन त्या इसमाच्या पोटात चाकु मारून खून केला असल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हयाचे
तपासकामी पोलिसांनी आरोपीस अटक केली. सदर गुन्हयातील आरोपीस मा. न्यायालयाने दिनांक ११/०८/२०२२ रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास नारायण पवार पोलीस निरीक्षक, यवत पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, मिलींद मोहिते, उपवभिागीय पोलीस अधिकारी, राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली खालील पोलीस पथकाने केली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहा. पोलीस निरीक्षक, केशव वाबळे, पो.हवा. निलेश
कदम, पो. हवा. गुरुनाथ गायकवाड, पो. ना. अक्षय यादव, पो. शि. मारुती बाराते तसेच स्थानिक गुन्हे शाखे कडील पो.हवा. सचिन घाडगे, पो.हवा. अजित भुजबळ, पो.हवा. अजय घुले यांचे पथकाने केली आहे.