पुरंदर : सहकारनामा
पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे (जेजुरी) येथे खोमणे मळा येथील मोकळ्या मैदानामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला असून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. ११/०२/२०२१ रोजी सायं ६:३० वा.चे सुमारास पोलीसांना कोळविहिरे, खोमणे मळा येथील मोकळ्या मैदानात एक कार उभी असलेली आढळून आली. पोलिसांना या कारचा संशय आल्याने त्यांनी अविनाश विष्णू राठोड (वय 60 नाझरे कप, मधला मळा, पुरंदर) यांना कोळविहीरे गांवाचे हद्दीत खोमणेमळा येथे मोकळे मैदानात बोलावले त्यावेळी अविनाश राठोड त्यांची पत्नी कविता व असे सर्वजण तेथे आले असता तेथे मैदाणात त्यांची मारूती सुझुकी ए स्टार क्रमाक एम.एच.१२ एच.झेड १६३० ही मैदाणात उभी असलेली दिसली.
त्यांनी गाडीमध्ये आम्ही पाहणी केली त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण या कारमध्ये त्यांचा मुलगा सचिन हा गाडीत मागील सिट समोर गाडीच्या उजव्या बाजुला उत्तरेकडे तोंड व पाय मुडपलेल्या स्थितीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृत अवस्थेत आढळून आला.
या कारचे पाठीमागील सीट रक्ताने माखलेले होते व कारमध्ये रक्ताचे थारोळे तयार झालेले होते. अधिक पाहणी केल्यानंतर पाठीमागील उजव्या दरवाजाला रक्त लागलेले दिसले तसेच मृताचे शर्ट व पॅन्ट रक्ताने माखून त्याच्या डोक्यात कापीव जखमा आणि उजव्या डोळ्याजवळ
खोल जखम दिसत होती.
त्यामुळे अविनाश राठोड यांची खात्री झाली की त्यांचा मुलगा सचिन अविनाश राठोड याचा कोणीतरी अज्ञात इसमाने तिक्ष्ण हत्याराने वार करून खुन केलाला आहे.
यावरून अविनाश राठोड यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.