Categories: Previos News

Murder – ‛खून’ करून मृतदेह भीमा नदी पात्रामध्ये टाकला! दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील खानवटे या गावचे हद्दीमध्ये एका तरुणाचा प्लास्टिक पट्टीने हात पाय बांधून नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे, याबाबत दौंड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खानवटे येथील आण्णासाहेब शहाजीराजे भोसले यांचे जमिनीच्या पुर्वेस भिमा नदीच्या पाण्याच्या पात्रात एक पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ३५ वर्षाचे (नाव व पत्ता माहीत नाही) आढळून आले.

सदर मयताचे दोन्ही हात व दोन्ही पाय बॉक्स पॅकींग करण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पट्टीने बांधलेले होते. त्यामुळे या तरुणाचा कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी अज्ञात ठीकाणी खून करून त्याचा मृतदेह भिमा नदीच्या पात्रात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना आढळून आले.

याबाबत खानवटे च्या पोलीस पाटील उर्मिला उत्तम गायकवाड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

17 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

19 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

20 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago