|सहकारनामा|
शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या तळेगाव ढमढेरे येथे एकाचा दगडाने ठेचून खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी काही तासांतच एका आरोपीला जेरबंद केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दि. 5 जून रोजी दुपारी साधारण पावणेदोन वाजण्याच्या आसपास
नवनाथ संपत चौधरी (रा. पाबळ, ता.शिरुर, जि. पुणे) या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. हा खून न्हावरा तळेगाव रोड लगत असणाऱ्या प्रतिभा दूध डेअरी जवळ करण्यात आला होता तसेच हा खून कोणी केला याबाबत माहिती पोलिसांना मिळत नव्हती.
खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याने पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक तसेच बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शिरूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना तपासाबाबत सूचना केल्या होत्या.
यावेळी शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या गंभीर गुन्ह्याची उकल काही तासांतच केली आणि या खून प्रकरणातील संशयित आरोपी हरीश सुधाकर काळे ( वय 25, रा. खंडोबाची आळी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे) याला ताब्यात घेतले.
आरोपीने पोलीसांच्या चौकशीत सदरचा गंभीर गुन्हा हा अनैतिक संबंधातून केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
सदरील घटनेचा तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, शिवराम खाडे, राजेश माळी, पो.हवा. पंडित मांजरे, जितेंद्र पानसरे, दत्तात्रय शिंदे, अजिनाथ शिंदे, पो.ना.अमोल चव्हाण, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, संतोष शिंदे, पो. कॉ. महेंद्र पाटील, भरत कोळी, शिवाजी चिताळे, राहुल वाघमोडे, जयराज देवकर, लक्ष्मण शिरसकर यांनी केला.