| सहकारनामा |
मुंबई :
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरून पुन्हा एकदा चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
काल राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची मागणी केली होती, त्यावर रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना भाजपच्या चित्रा वाघ यांनी मिश्किल भाषेत टिप्पणी करत… फडणवीसांना अटक करा म्हणणे म्हणजे काय.. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांचा समाचार घेतला आहे.
हा सर्व वाद कोरोनावर प्रभावीपणे काम करणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन वाढला असून यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या अक्षरशा द्वंद्व माजले आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असा आरोप करून त्यांना अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती.
रुपाली चाकणकर यांच्या या मागणीला उत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करणं म्हणजे काय, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय ! असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना विचारला आहे.