Categories: Previos News

Mumbai – “मेंढपाळ संरक्षण कायदा” करून मेंढपाळांना ‛शस्त्र’ बाळगण्याचा कायदेशीर अधिकार द्यावा : नवनाथ पडळकर यांची गृहमंत्र्यांसमोर मागणी



मुंबई : सहकारनामा ऑनलाइन

‘जनता राज अभियान’ आयोजित “मेंढपाळ हक्क परिषदे” तील प्रमुख मागण्यावर चर्चा करण्यासाठी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत  मेंढपाळ संरक्षण ,  शस्त्र परवाना , आंदोलनातील गुन्हे मागे घेणे यावर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बरोबर बैठक पार पडली. 

या वेळी जनता राज अभियान चे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ हक्क परिषदेचे निमंत्रक नवनाथ पडळकर यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या.

 १) मेंढपाळ समाज बांधवांवर राज्यात वाढते हल्ले  होत आहेत. त्यावर कायमचा उपाय म्हणून “मेंढपाळ संरक्षण कायदा”  मंजूर करावा. यात मेंढपाळावर होणारा हल्ला हा “अजामीनपात्र गुन्हा” म्हणून नोंद केला जावा. व तसा  कायदाच करून संरक्षण प्राप्त व्हावे.

२) मेंढपाळ समाज हा हजारो वर्षा पासून जंगल दर्या खोऱ्यात दुर्गम भागात वावरत आला आहे. या भागात स्वसंरक्षण करण्यासाठी व पशुधन संरक्षणासाठी तो हजारो वर्षांपासून कोयते, विळा, कुऱ्हाड, काठी अशी शस्त्रे बाळगत आला आहे. म्हणजेच ही शस्त्रे धनगरी मेंढपाळ संस्कृती चे मूलभूत घटक आहेत. त्यामुळे अशी “शस्त्र बाळगणे” हा मेंढपाळ समाजाचा “सांस्कृतिक अधिकार” आहे.

या सांस्कृतिक अधिकाराला आता आपल्या सरकारने “कायदेशीर अधिकार” म्हणून दर्जा बहाल करावा. त्याचबरोबर आवश्यक तेथे स्वसंरक्षण करण्यासाठी मेंढपाळ समाजाला बंदुकीचा परवानाही दिला जावा.

३) आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत:

आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवर, समाजसेवक यांच्यावर गेल्या 20 वर्षात नोंदविलेले व दाखल केलेले विविध प्रकारचे गुन्हे  मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून लवकरात लवकर गुन्हे मागे घ्यावेत.

या मागण्या मा.नवनाथ पडळकर यांनी मुद्देसूदपणे मांडल्या व “मेंढपाळ हक्कनामा” मंजूर करावा असा गृहमंत्री यांच्या समोर आग्रह धरला.

लवकर निर्णय न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलन उभे करावे लागेल अशी भूमिका यावेळी त्यांनी घेतली. मेंढपाळ समाजाला संरक्षण देण्याची हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली  व तसे निर्देश पोलिस महासंचालक यांना देवून कायदेशीर तरतुदी करू व अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले.

या वेळी मंत्री दत्तामामा भरणे, तसेच रामराव वडकुते, रमेश शेंडगे, हरिभाऊ भदे, प्रकाश शेंडगे हे माजी आमदार तसेच उत्तम जानकर, गणेश हाके, अनिल गोयकर, सक्षना सलगर, मल्लिकार्जुन पुजारी, आनंद कोकरे आदी नेते व अनेक मेंढपाळ बांधव प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते..

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

10 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago