Mumbai : कोरोनाविरोधी लढ्यात राजकारण आणू नये, पंतप्रधानांनी ‛त्यांना’ समज द्यावी – मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांशी संवाद साधत केल्या ‛या’ मागण्या



– सहकारनामा

मुंबई : 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्या पंतप्रधानांपुढे मांडल्या आहेत. या मागण्यांमध्ये एक अशीही मागणी केली की कोरोनाविरोधी लढ्यात कोणत्याही पक्षाने राजकारण आणू नये, पंतप्रधानांनी अश्यांना समज द्यावी हे त्यांनी आवर्जून नमूद केले.

मुख्यमंत्र्यांनी पुढील प्रमाणे मुद्दे मांडत त्याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे.. 

त्या मागण्यांमध्ये

★ संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्रसुद्धा कुठेही मागे नव्हता आणि नाही.

★ कोविडविरोधातल्या या लढ्यात राजकारण आणू नये. सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी.

★ राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढवल्या असून आणखी वाढवण्यात येत आहेत.

★ महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे मत.

राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के अँटीजेन होतात जे समाधानकरक असले तरी वाढवायला हवे – केंद्रीय आरोग्य सचिव,

केंद्राने जादा १२०० व्हेंटीलेटर्स द्यावेत

राज्याला लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावे.

★ एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.

★ हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळेल

१५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे.

★ २५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण गरजेचे आहे.

★ देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमिडेसेवीरचा पुरवठा व्हावा.

★ या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावे. रेमिडेसेवीरचा अती व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती आयसीएमआरला करत असल्याचे त्यांनी आपल्या मुद्द्यांमध्ये म्हटले आहे.